एकाच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली तीन वेळेस

pcmc-main

टीम महाराष्ट्र देशा – पिंपरी-चिंचवड महापालिकेने एकाच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तीन वेळेस छापण्याचा पराक्रम केला आहे. पत्रिकेवर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचेच नाव छापण्याचे पदाधिकारी आणि प्रशासन विसरले होते. त्यामुळे पुन्हा नव्याने निमंत्रण पत्रिका छापली आहे. तर, गेल्या महिन्यात कार्यक्रम पत्रिका छापून ऐनवेळी कार्यक्रम रद्द केला होता. त्यामुळे तीनवेळा पत्रिका छापण्याची वेळ प्रशासनावर आली. निमंत्रण पत्रिकेवर नाहक पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर, निमंत्रण पत्रिकेची माहिती देण्यास जनता संपर्क आणि शिक्षण विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत होते.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. 17 ऑक्टोबर रोजी गुणवंत शिक्षकांचा सन्मान आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या हस्ते केला जाणार होता.

Loading...

तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे असणार होते. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली होती. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, माध्यमांना त्या पत्रिका वाटल्या देखील होत्या. मात्र, ऐनवेळी तो कार्यक्रम रद्द झाला. आता येत्या रविवारी (दि.5) शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली. अधिकारी, नगरसेवकांना दिली गेली देखील.मात्र, या पत्रिकेवर सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी पुण्याचे पालकमंत्री असलेले भाजपचे आमदार गिरीश बापट यांचेच नाव टाकण्याचे विसरले होते.

प्रोटोकॉलनुसार निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्र्यांचे नाव टाकणे गरजेचे असते. मात्र, भाजपचे पदाधिकारीच पालकमत्र्यांचे नाव टाकण्याचे विसरले होते. चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा नव्याने निमंत्रण पत्रिका छापली गेली आहे. त्यामुळे शिक्षकांचा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तीन वेळा छापली गेली आहे. यावर लाखो रुपयांची उधळपट्टी झाली. याबाबत जनता संपर्क विभाग आणि शिक्षण विभागाच्या अधिका-यांकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील विविध कार्यक्रमाचे उद्‌घाटन झालेल्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील दोनवेळा छापली गेली होती. शिवसेना खासदारांची निमंत्रण पत्रिकेच्या डाव्या बाजूला नावे टाकली होती. मात्र, ती नावे प्रमुख उपस्थितांमध्ये टाकण्यासाठी पुन्हा निमंत्रण पत्रिका छापली होतीLoading…


Loading…

Loading...