विठुरायाचं दर्शन महागलं, ऑनलाइन बुकिंगसाठी मोजावे लागणार आता शंभर रुपये

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनासाठी इतके दिवस शुल्क आकारणी केली जात नव्हती. आज (शनिवार) झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत ऑनलाइन दर्शनासाठी नाममात्र शंभर रुपये फी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

गत वर्षात १३ लाख भाविकांनी ऑनलाइन बुकींग करुन विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आहे. आता ऑनलाइन बुकींगसाठी १०० रुपये फी केल्याने मंदिर समितीला ऑनलाइन बुकींग दर्शनातून कोट्यवधी रुपये उत्पन्न मिळणार आहे.

मंदिर समितीच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासमध्ये सहअध्यक्ष ह. भ. प. गहणीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची पहिली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

You might also like
Comments
Loading...