विनोद तावडे आणि राज ठाकरेंमध्ये ‘कृष्णकुंज’वर तब्बल एक तास गुफ्तगू !

मुंबई आणि कोकणातील शिक्षक-पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे शिक्षणमंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही. अस असल तरी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

तर दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील शिक्षक-पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठीच गिरीश महाजन यांनी कालच छगन भुजबळ यांची भेट घेतली होती तर आज विनोद यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

खर तर ठाण्यामध्ये नाट्यसंमेलन होणार आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी स्वत: विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे. परंतु निमित्त जरी आमंत्रणाचं असलं तर भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतं.