fbpx

ऊसाच्या रसाचा एक ग्लास तीन लाखाला पडला !

शिरूर/प्रमोद लांडे – दहा रुपयांना मिळणारा उसाचा रस एका व्यक्तीला चक्क तीन लाखाला पडल्याची घटना उघडकीस आली आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटणार. काहींना हे खोट देखील वाटेल. पण झाल अस की शिरूर येथिल हॉटेल वैभवनजीक रसाच्या गु-हाळावर रस पिण्यासाठी थांबलेल्या एकाच्या गाडीची काच फोडुन चोरांनी सुमारे तीन लाख रुपये लंपास केले आहेत.

या संदर्भात विजय छबन महारनोर (वय.३०, रा. सध्या ढोकसांगवी, मुळ गाडगीळवस्ती, यवत ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय महारनोर हे जय मल्हार ट्रॅव्हल्समध्ये सुपरवायझर म्हणुन काम करतात. तसेच ते कंपनीचे आर्थिक व्यवहार देखील पाहतात.

शुक्रवार सकाळी अकराच्या सुमारास या ट्रॅव्हल कंपनीचे मालक सुहास मलगुंडे यांची कार घेउन महारनोर कॉर्पोरेशन बॅंक येथे पैसे काढण्यासाठी आले होते. कंपनीच्या अकाउंट त्यांनी तीन लाख रुपये काढले. हे पैसे इनोव्हा कारच्या क्लिनर बाजुच्या सिट समोरील डिकीत ठेवले. तेथून ते गाडी घेउन कारेगावला निघाले.

रस्त्याने जात असताना पुणे – नगर हायवेवर असणाऱ्या बो-हाडेमळा येथे आले असता, हॉटेल वैभव शेजारील रोडच्याकडेला असणा-या उसाच्या गु-हाळावर महारनोर यांनी गाडी थांबवली. गाडी लॉक करुन ते रस पिण्यास गेले. रस पिऊन माघारी आल्यानंतर क्लिनर बाजुच्या पुढील दरवाजाची काच फुटल्याच त्यांना दिसले. तसेच डिक्कीतील पैसे देखील लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखाल करण्यात आली आहे. पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रविंद्र पाटमास हे करत आहेत