एक दिवस कराचीही अखंड भारतात सामील होणार, देवेंद्र फडणवीसांना विश्वास

devendra fadanvis

मुंबई- मुंबईतील कराची बेकरीच्या नावाला शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांनी आक्षेप घेतला आहे. वांद्रे येथील कराची बेकरीचं नाव बदला, अशी मागणी नांदगावकरांनी केली आहे.कराची हे नाव पाकिस्तानमधील आहे आणि या नावामुळे आपल्या सैनिकांचा अपमान होतोय, असं सांगत कराची बेकरीचं नाव बदलण्याची मागणी नितीन नांदगावकरांनी केली आहे.

अशातच, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून बेकरीचे नाव बदलण्याची भूमिका ही पक्षाची अधिकृत नसल्याचं म्हटलं आहे. ‘कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही.’ असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, आता भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ‘अखंड भारत’ या संकल्पनेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. ‘आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मुंबईतील एका ‘कराची स्वीटस्’ नामक दुकानावरून शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या