Share

Shivsena | “एक दिवस भाजप या गद्दारांना…”; सेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

औरंगाबाद :  सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप, टोलेबाजी करण्याची चढाओढ लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एकनाथ शिंदे गटावर जहरी टीका केली आहे.

एकनाथ शिंदे गटावर वारंवार गद्दारी केल्याचे आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून केले जातात. याच संदर्भात बोलत अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहेत. एक दिवस भारतीय जनता पार्टीच या गद्दारांना मातीत मिसळवणार असल्याचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. आज होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सगळ्याचं लक्ष आहे. अशातच दानवेंनी हा शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

आज एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. सर्वांचं लक्ष दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यावर लागलेलं आहे. औरंगाबादचे ग्रामदैवत असणाऱ्या कर्णपुरा देवीची आरती करून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत.

दरम्यान, “गद्दारीच्या पिकाचा नायनाय करण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो. महाराष्ट्रात शिवाजी पार्कवरुन विचारांचं सोनं लुटलं जातं. तसंच ते आजही लुटलं जाईल,” असे अंबादास दानवे म्हणाले. दानवेंच्या या वक्तव्याला शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

औरंगाबाद :  सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now