#Budget 2019 : लहान उद्योगांसाठी ५९ मिनिटात मिळणार १ कोटी कर्ज

टीम महाराष्ट्र देशा- अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारचं बजेट सादर करत आहेत. यावेळी कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. सर्वानं हक्काचं घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं यापूर्वीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता सरकारी कंपन्यांच्या जमिनीवर परडवणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

सीतारमण यांनी लघू उद्योजकांना त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अति श्रीमंतांवरचा कर मोदी सरकारने वाढवला आहे. लहान उद्योगांसाठी ५९ मिनिटात मिळणार १ कोटी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरम्यान टॅक्स स्लॅबमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. करदात्यांबाबत बोलताना सुरूवातीलाच त्यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, सोने-चांदीच्या सीमाशुल्कात २ टक्क्यांनी वाढ, सीमाशुल्कात वाढ केल्याने सोने-चांदी महागणार. पेट्रोल-डिझेलवर १ रुपये अतिरिक्त कर आकारण्यात येणार

#Budget 2019 live updates

– सोने, मौल्यवान वस्तू महागणार, सीमाशुल्कात २ टक्के वाढ

– पेट्रोल, डिझेलच्या दरात होणार वाढ, १ रुपया उत्पादन शुल्क वाढविले

– मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर, ५ लाख उत्पन्नावर कर नाही

-गृहकर्ज घेण्याऱ्यांसाठी दिलासा, ४५ लाखाच्या कर्जावर साडेतीन लाख रुपये व्याज माफ

-इलेक्ट्रीक वाहन घेताना जीएसटीमध्ये मोठी सूट

-लहान उद्योगांसाठी ५९ मिनिटात मिळणार १ कोटी कर्ज

-प्राप्तिकर आता आधारकार्डाद्वारेही भरता येणार, पॅनकार्डची आवश्यकता नाही

– सोन्यासह पेट्रोल-डिझेल महागणार

– २ ते ५ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास ३ टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार

– एका वर्षात बँकेतून १ कोटीपेक्षा जास्त रक्कम काढल्यास २ टक्के टीडीएस कापला जाणार

– ४५ लाखांच्या गृहकर्जावर व्याजामध्ये आता साडेतीन लाख रुपये सुट

– पॅन कार्ड आणि आधारकार्ड इंटरचेंजेबल, आयकर भरताना पॅन किंवा आधार दोन्हीपैकी एकाचा करता येणार वापरLoading…
Loading...