एक देश एक भाषा हे भारतासाठी योग्य नाही : शशी थरूर

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘एक देश एक भाषा’ करण्याचा नारा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हिंदी दिनाच्या दिवशी दिला होता. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आता कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही अमित शहांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पुणे येथील एका कार्यक्रमात बोलतान शशी थरूर यांनी एक भाषिक राष्ट्राचे तोटे सांगितले आहेत.

शशी थरूर म्हणाले की, एक भाषा एक देश हे धोरण भारताच्या एकतेसाठी योग्य नाही. 1965 मध्ये भारताने त्री भाषीय धोरण अवलंबले आहे. एक देश एक भाषा धोरण राबविल्यास भारतातील विविध भाषिक लोकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे होईल. भाजपाचे राजकारण हे हिंदी, हिंदुत्व याच्या भोवतीच चालते. त्यांना दक्षिण भारतामध्ये मते मिळत नाहीत. एक देश एक भाषा केल्यास भारतातील विविध भाषिक लोकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे होईल.

दरम्यान देशातील एकात्मता टिकवण्यासाठी एक भाषा असणे आवश्यक आहे. देशाला कोणत्या भाषेने एकसंध बांधून ठेवले असेल तर ते हिंदी या भाषेने ठेवले आहे. त्यामुळे हिंदी ही या देशाची एक भाषा असल्याचा नारा अमित शहांनी दिला आहे. याला कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी विरोध केला आहे.