‘एक देश, एक निवडणूक’ काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीसोबतच ११ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलीय… ‘एक देश, एक निवडणूक’ अशी भाजपची संकल्पना असून, तसं झाल्यास संविधानात कोणताही बदल न करता, एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेता येऊ शकतात, असं भाजपचं म्हणणं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांनी याला विरोध केला आहे. तर भाजप लोकसभा, विधानसभा एकत्र घेण्याबाबत अन्य राजकीय पक्षांचं एकमत व्हावं, यासाठी भाजपनं खटाटोप सुरू केलाय.

दरम्यान, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि भाजपच्या सर्व मंत्र्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना यावेळी दिले. मंत्रीपद स्वीकारताना ‘सर्वांशी समानतेने वागेन’ अशी शपथ घेतली जाते. देशात खरोखरच लोकशाही असेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्री हे भाजपच्याच प्रचारासाठी का जातात? त्यांनी सर्वच पक्षांचा, अगदी अपक्षांचाही प्रचार केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

Loading...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आजच विधी आयोगाला पत्र पाठवून एकत्र निवडणुका घेण्याची मागणी केलीय. भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, झारखंड, मिझोराम आणि बिहारमध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात, असा भाजपचा आग्रह असल्याचं समजतंय.

भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार केवळ जाहिरातबाजी करणारे; उद्धव ठाकरे

आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ