एका उमेदवाराने दोन ठिकाणी निवडणूक लढवू नये: निवडणूक आयोग

टीम महाराष्ट्र देशा: निवडणूक लढवताना एका उपेद्वाराने फक्त एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालायात सादर केले आहे. जर एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जर तो उमेदवार दोन्ही ठिकाणी जिंकेल तर त्या उमेदवाराला एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. नंतर त्या जागेसाठी फेर निवडणूक घ्यावी लागते व त्यासाठी अतिरिक्त खर्च येतो व वेळ देखील जास्ती लागतो, असे प्रतिपादन निवडणूक आयोगाने न्यायालयात म्हणटल आहे.

भाजप नेत्या व याचिकाकर्त्या अश्विनी उपाध्याय यांनी एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये अशी मागणी केली होती. त्यामुळे यापुढे एका उमेदवाराने एकाच ठिकाणी निवडणूक लढवावी लागेल हे मात्र नक्की आहे.