Breaking : गौरी लंकेश हत्येप्रकरणी चिंचवडमधून एकाला अटक

gauri lankesh हत्या

पुणे: सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांकडून २०१७ मध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आता पुण्यातील चिंचवड मधून अमोल काळे ऊर्फ भाईसाहब (३७) याला एसआयटीने अटक केली आहे.

गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांच्या घराबाहेर बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. गौरी लंकेश या आरएसएस व कट्टर हिंदूत्ववादी यांच्या विरोधात परखड लिखाण करीत होत्या. त्यामुळे देशातील तथाकथित धर्मवादी व्यवस्थेला अडचणी निर्माण झाल्या. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप पुरोगामी संगटनांकडून करण्यात येत आहे.