दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप 

विसर्जन ganesh
राज्यभरात तसेच मुंबईच्या चौपाट्यांवर मोठ्या उत्सहात दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं.  दादर चौपाटीवर दीड दिवसाच्या गणपतीच विसर्जन करण्याकरता मोठ्याप्रमाणावर भाविकांनी गर्दी केल्याच चित्र पहायला मिळालं. 

मुंबईत पावसाची संततधार सुरू असताना देखील गणेश भक्तांचा उत्साह कमी झाला नव्हता आज पहाटे ५.३० वाजेपर्यंत कुलाब्यात ३२.८ मिमी पावसाची नोंद झालीय. तर सांताक्रुजमध्ये ८५.५ मिमी पावसाची नोंद झालीय. दादर चौपाटीवर दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली होती . मुंबईत गिरगाव, जुहू, दादर चौपाटी इथे बाप्पांच विसर्जन करण्यात आलं तर काही ठिकाणी अजूनही विसर्जन सुरु आहे . दरम्यान बाप्पांच विसर्जन करताना सुरक्षा यंत्रणांनी भाविकांना सावधानतेचा इशारा दिलाय.