‘हा’ कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणातून निवृत्त होईन : गिरिराज सिंह

टीम महाराष्ट्र देशा : ” अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आपले काम पूर्ण झाले आहे. आता फक्त लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा तयार झाला की, मी स्वतः राजकारणापासून दूर होईन,” असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी वादात अडकणारे गिरिराज सिंह आता या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी आता राजकारणापासून दूर जाण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

आपल्या खळबळजनक वक्तव्याने सिंह नेहमीच चर्चेत असतात. अशातच त्यांनी राजकीय निवृत्तीबाबत आपले मत व्यक्त केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शनिवारी ते म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराची स्थापना करण्याचे माझे काम पूर्ण झाले आहे. माझ्यासारख्या लोकांची आता राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली आहे. विशेषतः लोकसंख्या नियंत्रण कायदा झाल्यास मी स्वतःहून राजकारणापासून वेगळा होईन.

गिरिराज सिंह हे बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून लोकसभेवर गेले आहेत. त्यांच्याविरोधात विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार उभा होता. गिरिराज सिंह हे केंद्र सरकारमध्ये पशुपालन, डेअरी आणि मत्स्य पालन मंत्री आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :