केंद्र सरकारची परवानगी मिळताच, राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार : बबनराव लोणीकर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि जनावरांची अवस्था दयनीय झाली आहे. या दयनीय अवस्थेवर राज्य सरकारने तोडगा काढण्यासाठी कृत्रीम पावसाचा घाट घातला आहे. या संदर्भात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारकडे राजू शासनाकडून परवानग्या मागितल्या आहेत. या परवानग्या ३० तारखेपूर्वी मिळण्याची शक्यता आहे. परवानगी मिळताच कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे, अशी माहिती स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर दिली आहे.

याबाबत ते म्हणाले की, राज्यात कुठेही पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पिकं करपून जात आहेत. त्यामुळे राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या १० वेगवेगळ्या विभागाकडे परवानग्या मागितल्या असून येत्या ३० तारखेपूर्वी केंद्राच्या सर्व विभागाच्या परवानग्या मिळतील. त्यानंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल.

दरम्यान जुलैच्या सुरवातीला राज्यातल्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात एक ही मुसळधार पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्हे हे अजूनही तहानलेले आहेत. शेतकरी वर्ग निसर्गापुढे हताश झाला आहे. तर जनावर चारा – पाण्याच्या कमतरतेमुळे जीव गमावत आहेत.