धनुष्यातून स्वबळाचा बाण सुटला, आता माघार नाहीच! – संजय राऊत

नवी दिल्ली : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर भाजप नेत्यांनी शिवसेनेने परत विचार करावा असे म्हटले होते. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. लोकसभा आणि विधानसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयापासून आम्ही मागे हटणार नाही. आता धनुष्यातून बाण सुटलाय, त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलतांना मोदी सरकारवर निशाना साधत जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प फक्त कागदावरच खूप चांगला वाटतोय. सध्या देशभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्यातरी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीविषयी इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे राऊत यांनी सांगितले. तसेच गुजरात निवडणूक ट्रेलर होता. राजस्थानची पोटनिवडणूक इंटरव्हल आहे. आता संपूर्ण पिक्चर २०१९ मध्ये पूर्ण होईल,’ राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला आहे. राजस्थानमध्ये भाजपची सत्ता असतानाही भाजपच्या खात्यातून या तीन जागा काँग्रेसने खेचून घेतल्यानंतर भाजपवर सर्वच पक्षाने टीका करायला सुरुवात केली आहे.

You might also like
Comments
Loading...