विधान परिषदेला भाजपशी युती तरीही उद्धव ठाकरे म्हणतात, निवडणुका स्वबळावरच लढणार

नाशिक: शिवसेना आधी जाहीर केल्याप्रमाणे स्वबळावर निवडणूक लढणार असून निर्णयापासून माघार घेणार नसल्याच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना भाजप स्वतंत्र निवडणूक लढणार असल्यानेच कॉँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

सध्या वनगा कुटुंबियांच्या शिवसेना प्रवेशावरून भाजप सेनेमध्ये राजकारण रंगत आहे. याबदल विचारल असता, माजी खासदार चिंतामणराव वनगा यांनी पालघर सारख्या भागात संपूर्ण आयुष्यभर हिंदूत्व, संघ आणि भाजपासाठी वेचल आहे. वनगा यांचे कुटुंबीय मातोश्रीवर आल्यावर आपण त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यासाठी विचारले, पण त्यांनी आम्हाला याचा पुन्हा अनुभव घ्यायचा नाही, आम्हाला शिवसेनेत यायचं आहे म्हणल्यावरच आम्ही त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याच उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भुजबळ आणि खडसेंसोबत जे झाल ते सर्वांनी बघितल असल्याच म्हणत दोन्ही नेत्यांबदल बोलण्याच त्यांनी टाळल आहे.

नाणार प्रकल्प विदर्भात जाणार असले तर काही हरकत नाही, विदर्भाच्या विकासाच्या गप्पा न मारता खरा विकास करणे गरजेच असल्याच मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.

You might also like
Comments
Loading...