पुन्हा एकदा हायकोर्टाचा दीपक मानकरांना दणका !

मुंबई : पुण्यातील कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील तिसऱ्या खंडपीठाने मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला.न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी बुधवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यापूर्वी देखील मानकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला झाल्यापासून मानकर गायब आहेत. पुणे पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येतोय. काल पुण्यातील दोन्हीही घरी तो पोलिसांना ते भेटले नाहीत.
मानकर यांच्या राजकीय कारकिर्दीला हा मोठा धक्का मानला जात आहे. मानकर यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दीपक मानकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

जितेंद्र जगताप यांच्या ताब्यात रास्ता पेठेत समर्थ पोलिस ठाण्यासमोर असलेली 481 रास्ता पेठ येथील जमीन आहे. या जमीनीबाबत दिपक मानकर व त्यांचे व्यावसायिक भागीदार सुधीर कर्नाटकी यांच्या ताब्यात असलेल्या व देखभाल करत असलेल्या या जमीनीबाबत मागील दहा ते बारा वर्षांपासून व्यवहार सुरु आहेत. दरम्यान या जमिनीचा ताबा मिळावा म्हणून जगताप यांच्यासोबत मानकर व कर्नाटकी यांच्यात दोन तीन वेळा बैठक झाली. त्यांना ही जागा ताब्यात देण्यासाठी व कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या जमीनीच्या देखभालीसंदर्भात आजपर्यंत केलेल्या मेहनतीचा व देखभालीचा योग्य मोबदला दिल्यास आपण या कागदपत्रांवर सह्या करू असे जगताप यांनी सांगितले होते.

त्यानंतर शुक्रवारी जगताप यांनी जयेश जगताप यांना या बैठकांतील सर्व हकिकत सांगितली. तसेच या जागेचा ताबा तू भविष्यात दिला नाही तर कागदांवर सह्या करून कसा ताबा घ्यायचा आहे हे मला माहित आहे. यात माझा लौकीक आहे. तू घरी जाऊन विचार कर असे धमकावले. त्यानंतर शनिवारी सकाळी जगताप नेहमीप्रमाणे त्यांच्या रास्ता पेठेतील या जागेवर गेल्यावर तेथे विनोद भोळे व इतर सहा ते सात जण तेथे आले. त्यांच्यात तेथे बोलणे झाले. त्यामुळे ते घाबरलेल्या स्थितीत बाहेर आले. काही कामानिमित्त ते तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी घोरपडी येथे आत्महत्या केली. त्यांच्यासोबत गेलेल्या रिक्षाचालकाजवळ त्यांनी लखोटा दिला होता. तो पाहिला त्यावेळी त्यात दिपक मानकर व सुधीर कर्नाटकी व फोटीतील व्यक्तींमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले होते. असे फिर्यादीत म्हटले आहे.

फडणवीस, कृषिमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार का?- धनंजय मुंडे