सगळ्याचं चोरांचे नाव मोदीच का? – राहुल गांधी

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. सगळ्याचं चोरांचे नाव मोदीच का? असा प्रश्न त्यांनी नांदेडमधील अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीत बोलताना विचारला आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडवून पळून गेलेला नीरव मोदी. आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी हे दोघेही चोर आहेत. या दोघांचे नाव घेवून राहुल गांधींनी नरेंद्र टोला मारला आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा राफेल प्रकरणावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. अनुभव नसतानाही अंबानी यांना कंत्राट कसे दिले गेले? अंबानी यांना कंत्राट देवून नागरिकांचे ३० हजार कोटी रुपये अंबानींच्या खिशात टाकले आहेत असा आरोपही राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

दरम्यान, भाजपने राहुल गांधी यांच्या टीकेवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी हे लोकांच्या जातीवरून अपमान करत आहेत असं या तक्रारीत म्हटले आहे.