मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

टीम महाराष्ट्र देशा : मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे गुलाब मारुती शिंगारी असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे  नाव असून, ते बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मंत्रालयात धर्मा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विष प्राशन केल होत तर उपचारादरम्यान धर्मा पाटील या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यानंतर मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली होती. सरकारने अशा प्रकारच्या घटना थांबण्यासाठी जाळ्या देखील लावल्या होत्या. मात्र, सरकार विरोधातील रोषामुळे मंत्रालयासमोरील आत्महत्येच्या प्रयत्नाचे लोन काही केल्या थांबताना दिसत नाहीये.

गुलाब शिंगारे या पेटवून घेणा-या शेतक-याला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतल असून पुढील तपास सुरु आहे.