मोठी बातमी: महाराष्ट्रात ‘या’ शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन  

lockdown

नवी मुंबई: लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाचा पादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या  १ लाख ४८ हजारांच्यावर पोहचली आहे. यामध्ये ६ हजार पेक्षा जात लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई शहरात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ आहे. शहरात वाढणारी संख्या पाहता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  29 तारखेपासून लॉकडाऊन लागू होणार असून 7 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन असेल. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलिसांची बैठक घेतली. त्यानंतर शिंदेंनी लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात घरोघरी मास स्क्रिनिंग केली जाणार आहे.