पुन्हा एकदा गिरीश बापटांचा विद्यार्थिनींसमोर सुटला तोल

girish bapat

पुणे: भाजप मधील नेत्यांचे बेताल वक्तव्य करण्याचे सत्र सुरूच आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वी  ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांचा तोल गेला होता. त्यावेळी ‘तुम्ही ज्या क्लिप रात्री बघता त्या सगळ्या मला माहीत आहेत. रात्री सगळेजण कोणत्या आणि कुठल्या कुठल्या क्लिप बघतात. कारण तुम्ही जे पाहता ते मी पण पाहतो. त्यामुळे आम्ही म्हातारे झालो असे काही समजू नका. ‘आमचं देठ अजून हिरवं आहे’ असे वक्तव्य बापट यांनी केले होते.

आता पुन्हा एकदा पुण्यातील श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेच्या शताब्दीपूर्तीच्या कार्यक्रमात बोलत असतांना गिरीश बापट यांचा तोल सुटला. त्यामुळे त्यामुळे उपस्थित विद्यार्थिनी, शिक्षिकांच्या माना शरमेने खाली झुकल्या.

काय म्हणाले गिरीश बापट?
‘स्वामी विवेकानंद परदेशात गेले होते. तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि भाषणामुळे आकर्षित झालेल्या परदेशी युवतीने विवेकानंदांना भेटून त्यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. ‘आपण लग्न केले तर आपल्याला तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा होईल’‘तो काळ आतासारखा नव्हता. चल म्हटली की चालली! विद्यार्थिनींना कळले बघा,