पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

अलाहाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथील त्रिवेणीपुरम येथे हा प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींना अटक करण्याची मागणी केली.

उत्तर प्रदेश सरकारने नुकत्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात महत्त्वाचा बदल करण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मागास जाती आणि आदिवासींवर होत असलेल्या अत्याचाराकडे लक्ष देत नाही. त्यांना मतपेटीची चिंता लागली आहे. ‘व्होट बँके’साठी सरकार बाबासाहेबांना ‘रामजी’ बनवण्याकडे लक्ष देत आहे. पण त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) अध्यक्षा मायावती यांनी केला आहे. सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.