त्रिपुरात भाजप सत्तेच्या वाटेवर

काँग्रेसला अद्याप खातेही उघडता आले नाही

त्रिपुरा: त्रिपुरामध्ये भाजपने जवळजवळ एकहाती सत्ता मिळवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्रिपुरात भाजपाने ४० जागांवर आघाडी घेतली आहे. तर डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. त्रिपुरा येथील मॅजिक फिगर ३१ आहे. त्यामुळे भाजपाला येथे स्पष्ट बहुमत मिळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजप सत्तेच्या वाटेवर आहे.

गेल्या २० वर्षापासून त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेले माणिक सरकार सध्या पिछाडीवर असल्याचं  समजतं आहे. त्यामुळे सीपीएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आता त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे त्रिपुरा अध्यक्ष विप्लव देव यांचं नाव सध्या मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

अडीच दशकांपासून त्रिपुरात डाव्यांचे सरकार आहे. हे सरकार नाकारत मतदारांनी भाजपाला कौल दिला आहे. हातात आत्तापर्यंत आलेले कल आहेत त्यात भाजपाने सीपीएमला आस्मान दाखवले आहे. एकूण ६० जागांपैकी ३६ जागांवर भाजपाची आघाडी आहे. तर सीपीएम २३ जागांवर पुढे आहे. काँग्रेसला अद्याप त्रिपुरात खातेही उघडता आलेले नाही.

You might also like
Comments
Loading...