गृहमंत्री उद्या देणार फडणवीसांच्या आरोपांना उत्तर; काय असेल राज्यसरकारचे स्पष्टीकरण?

मुंबई: काल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील आणि एसीपी यांना हाताशी धरून सरकारने षडयंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे त्यानंतर त्यांनी एक पेनड्राईव्ह अध्यक्षांना दिला. फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या उत्तर देणार आहेत. दरम्यान, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. राजीनामा मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. दाऊदच्या दबावामुळे मालिकांचा राजीनामा मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर राज्य सरकार मलिक पाठीशी उभे आहे. त्याचबरोबर ते दाऊदच्या पाठीशी हे उभे आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सभागृह गोंधळ झाला. ज्यामुळे विधानसभेचे कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आले होते.

विधानसभा कामकाज दिवसभर तहकूब करण्यात आल्याने आता फडणवीस यांच्या आरोपावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उद्या उत्तर देणार आहेत. वळसे पाटील म्हणाले, काल जे आरोप केले त्याचे उत्तर उद्या द्यायला मी तयार आहे. त्यामुळे उद्या राज्य सरकार काय उत्तर देणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दरम्यान उद्या वळसे पाटील फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून त्यानंतर कारवाईचे आदेश देऊ शकतात. तसेच सरकारी वकीलांसह ज्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव फडणवीस यांनी घेतले आहे. त्यांच्याही चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या: