येत्या रविवारी बँकांना सुट्टी नाही: आरबीआय

टीम महाराष्ट्र देशा: १ एप्रिल ते ३१ मार्च हे आपल्या देशाचे आर्थिक वर्ष आहे. येत्या रविवारी या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. यामुळे सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना आपल्या शाखा सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

आरबीआयने सर्व बँकांना आदेश दिले आहेत की, सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँका ३० मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आणि ३१ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात याव्यात . RTGS आणि NFFT सह सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक व्यवहारही ३० आणि ३१ मार्च २०१९ रोजी जास्त वेळ सुरु राहील.

महिना अखेर तसेच चालू आर्थिक वर्षाचाही शेवटचा दिवस असल्याने सरकारी कामांचं देणं आणि सरकारी पावत्यांची कामं यासाठी ३१ मार्च २०१९ रोजी सरकारचे सर्व अकाऊंट सुरु राहणे गरजेचे आहे त्यामुळे ही कामं रखडू नये यासाठी रविवारी सरकारी बँक सुरु ठेवण्यात येणार आहेत.
रविवार हा सुट्टीचा वार असल्याने नागरिकांनाही या सुट्टीचा फायदा होणार आहे.