fbpx

विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ‘या’ तारखेला ठरणार, पवारांची लागणार वर्णी ?

टीम महाराष्ट्र देशा : भाजपने नरेंद्र मोदींच्या रूपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार आधीच घोषित केला आहे. परंतु विरोधकांचा उमेदवार कोण याची चर्चाही आता रंगू लागली आहे. तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावरून भाजपकडून विरोधकांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे आता लवकरच या प्रश्नावर तोडगा निघणार आहे.

पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची २१ मे रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी माहिती दिली आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनापंतप्रधानपदाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.’ यामध्ये राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असं पवारांचं मत आहे.
दरम्यान, २१ तारखेला होणाऱ्या या बैठकीत वरील नावांसह पंतप्रधान पदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.