fbpx

सलग तिसऱ्या दिवशी शेतकरीकन्यांच अन्नत्याग आंदोलन चालूच

टीम महाराष्ट्र देशा: दीड वर्ष होत आली तरी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील तीन मुलींने ‘किसान क्रांती’च्या वतीने अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या तिघी शेतकरी कुटुंबातून आहेत. आज या शेतकरीकन्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांच्या वजनात घट होऊ लागली आहे.

दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. अनिश्चित पर्जन्यमान , वेळोवेळी करावा लागणारा दुष्काळाचा सामना , बँकांची शेतीसाठी घेतलेली कर्जे , नेहमीच तोट्यात नेणारा बाजारभाव यासाऱ्या कारणांमुळे शेतकरी भरडला जात आहे. तसेच सरकारची बेताल व अविश्वसनीय आश्वासन यासाऱ्या प्रकारामुळे शेतकरी कुटुंब हे नेहमीच दारिद्र्य रेषेच्या जवळ भटकत असते. शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध मागण्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी या तीन कन्यांनी गेले दोन दिवस झाल अन्नत्याग आंदोलन केले आहे.

दरम्यान  ‘आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष दिले नाही आणि काही बरेवाईट झाले तर त्याला सरकार जबाबदार असेल.’ असा इशारा देखील या कन्यांनी सरकारला दिला आहे.

1 Comment

Click here to post a comment