भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या चंद्रकांतदादांचा अजित पवारांना टोला

chandrakant-patil

मुंबई: सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्याच्या निमित्तानं भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. दरम्यान, भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा दिला.

विशेष म्हणजे कधी नव्हे ते चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेची बाजू घेत अजितदादांना खडे बोल सुनावले आहेत. शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लोबोल करणा-यांनी आधी स्वतःचा गल्ला भरलाय. भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना टोला लगावला आहे. चंद्रकांतदादा पाटलांनी अनपेक्षितपणे शिवसेनेची बाजू घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.Loading…
Loading...