fbpx

मतदान केंद्रावरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये जुंपली

नाशिक : आज नाशिकमध्ये विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी सुरू असलेल्या मतदानावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना उमेदवारांच्या समर्थकांदरम्यान जोरदार हाणामारी झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी तणावाची परिस्थिती कायम आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे आणि राष्ट्रवादीचे संदीप बेडसे हे प्रतिस्पर्धी आहेत. आज मतदान सुरू असतानाच सोशल मीडियावरून दराडे यांनी माघार घेतल्याचा मेसेज व्हायरल झाले. हे मेसेज राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीच व्हायरल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये भालेकर शाळेतील मतदान केंद्रावरच जुंपली. तसेच आमदारांनीही शिवीगाळ केल्याने कार्यकार्त्येंमध्ये शाब्दिक चकमकीचं रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांनी पळ काढला. यावेळी मतदान प्रक्रियाही काही काळ थांबवण्यात आली.

दरम्यान, मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाद मिटविल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या दराडे आणि बेडसे समर्थकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली असून नाशिकमधील सर्वच मतदार संघावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

1 Comment

Click here to post a comment