मुंबई: २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त राज्यसरकारने (State Government) एक नवीन आभियान राबण्याचा निर्णय घेतला, आता सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन ‘हॅलो’ ऐवजी वंदे मातरम (Vande Mataram) या शब्दांनी अभिवादन करावे लागणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. मात्र, या निर्णयाला अनेकांकडून विरोध केला जात आहे.
‘वंदे मातरम’ ला विरोध करणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी हल्लाबोल केला आहे. ‘वंदे मातरम’ ला विरोध करून काँग्रेसने पुन्हा एकदा आपली देशविरोधी मानसिकता दाखवून दिली असल्याचं राम कुलकर्णी म्हणाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र संग्रामात वंदे मातरम म्हणत फासावर चढलेल्या हुतात्म्यांचा अपमान केला असल्याचा दावा राम कुलकर्णी यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे. एकीकडे भारत जोडो यात्रा काढायची आणि दुसरीकडे मात्र ‘वंदे मातरम’ ला विरोध करायचा यातून काँग्रेसची दुटप्पी आणि ढोंगी भूमिका पाहायला मिळत असल्याची टीका कुलकर्णी यांनी केली.
आपल्याला पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’ व्यवहारात आणायचा असल्याने हॅलो नाही तर वंदे मातरम् म्हणायचं, ही चळवळ, आता केवळ चळवळ नसून गुलामगिरीच्या सर्व साखळ्या तोडून काढायची आहे, असं फडणवीसांनी स्पष्टं केलयं. यावर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP। प्रादेशिक पप्पू होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात, आमच्या शुभेच्छा; भाजपाचा पटोलेंवर हल्लाबोल
- Kishori Pednekar | “कोणी एैरा-गैरा नट्टू खैरा…”; मनसेच्या ‘त्या’ पोस्टवर किशोरी पेडणेकर भडकल्या
- Viral Video | लहान मुलाला सिंहासोबत खेळताना बघून व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ
- NCP | “गेल्या ११ महिन्यांपासून…” ; अनिल देशमुखांचा जामीन मंजूर होताच राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
- Cabinet meeting । शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील ७ कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट पॅकेज जाहीर