ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या निमित्ताने….

पुणे : 21 आणि 22 मार्च 1920 ला छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी माणगाव येथे पहिली अस्पृश्य परिषद घेतली. या परिषदेच्या निमित्ताने शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या संदर्भाने भविष्यवाणी केली, ती आज शंभर वर्षांनी खरी होताना दिसते आहे. या परिषदेत बोलताना शाहू महाराज म्हणाले होते की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला आहे. त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक पूर्व अभिनंदन करतो. डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. एक वेळ अशी येईल येईल की आंबेडकर केवळ अस्पृश्य नव्हे तर सर्व हिंदुस्तानचे पुढारी होतील, हे शाहू महाराजांचे विधान आज खरे होताना दिसते आहे. यासंदर्भात खा. संभाजीराजे भोसले यांनी एक लेख फेसबुकवर शेअर केला आहे.

महाराष्ट्र देशा’च्या वाचकांसाठीखासदार संभाजीराजे भोसले यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी :

Loading...

महापुरुषांना जाती – प्रांताच्या बंधनात अडकवून चालणार नाही, असं मला वाटतं. मी त्या शिवाजी महाराजांचा वंशज आहे, ज्यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. मी त्या राजर्षी शाहू महाराजांचा वंशज आहे, ज्यांनी बहुजन समाजाला न्याय दिला. सर्व जाती-पातींना सोबत घेऊन जाण्याची शिकवण शिव- शाहूंनी दिली आहे. कुणी कोणत्या जातीत जन्माला आला म्हणून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसतो. तो आपल्या कर्तृत्वाने मोठा किंवा लहान ठरत असतो.

राजर्षी शाहू महाराजांनी दाखवून दिले आहे, की सामान्य अस्पृश्य समाजातील व्यक्ती सुद्धा विचाराने आणि कर्तृत्वाने मोठा असेल तर त्याचा आदर केला पाहिजे. ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंधांवर थोडासा प्रकाश टाकावा म्हणून….

कोल्हापूर राज्यातील माणगाव येथे २१ व २२मार्च १९२०रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली, त्याला आज १००वर्षे पुर्ण झाली. या परिषदेचे प्रमुख पाहुणे राजर्षी शाहु छत्रपती महाराज तर , अध्यक्ष डाँ. बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यापक कार्याची सुरुवात या परिषदे पासून झाली.

बाबासाहेबांच्या जिवनातील सामाजिक, राजकीय, वैचारिक, संघटनात्मक वाटचालीत “माणगाव” परिषदेचे महत्व मोठे आहे.राजर्षी शाहू महाराजांनी, केलेल्या भाषणात पुर्वास्पृश्य समाजाला आपल्या “जातीचा पुढारी करा” असे आवाहन करुन, डॉ आंबेडकरांना ‘पंडित’ व ‘विद्वानांचे भुषण’ म्हणून गौरवलेले होते. येऊ घातलेल्या भारताचे नेतृत्व सुद्धा आंबेडकर करतील अशी भविष्यवाणी राजर्षींनी केली होती.

भाषणाच्या सुरुवातीस शाहू राजांनी आंबेडकरांचा उल्लेख “माझे प्रिय मित्र आंबेडकर” असा करताच हजारो दलितांनी महाराज आणि बाबासाहेब यांचा अखंड जयघोष करीत टाळ्यांचा पाउसच पाडला. प्रत्यक्ष छत्रपती आंबेडकरांना “प्रिय मित्र” म्हणतात याचे त्यांना कौतुक वाटले.

डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या नेत्रुत्वामुळे दलित उद्धाराच्या चळवळीला निर्णायक उभारी मिळाली.22 तारखेला आंबेडकरांनी मांडलेला एक ठराव संमत करण्यात आला तो सर्वांनी वाचावा. तो असा, “श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार, इलाका करवीर यांनी आपल्या राज्यात बहिश्कृतांना समानतेचे हक्क देऊन, त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे. याबद्दल (कृतज्ञता म्हणून) त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सनाप्रमाणे साजरा करावा.”

यातून आपल्याला हे लक्षात येईल की त्याकाळी महापुरुषांनी सर्व समाज एकत्र आणण्यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले होते. त्याच बरोबर त्यांचा परस्पर संबंध सुद्धा आदरयुक्त होता हे ही लक्षात येईल.पण उठता, बसता फुले, शाहु ,आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या या महाराष्ट्रात परस्पर जातीतले आंतर कमी करण्यासाठी आपल आयुष्य खर्ची करणाऱ्या या महापुरुषांच्या नावावरच आज जातींची अस्मिता कुरवळण्याचे प्रयत्न चालू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल ‘स्वराज्य’ सर्वसामान्य शेतकरी व कष्टकऱ्यांच होत. राजर्षी शाहू छत्रपतींची वाटचाल शिवछत्रपतींच्या आदर्शावरतीच चालत होती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या दोघांना अभिप्रेत असणारेच सुराज्य मांडले. असे मला वाटते.आजच्या दिवशी, माणगाव परिषद शताब्दी च्या निमित्ताने आपण सर्वांनी हाच संकल्प करूया की सर्वच महापुरुषांची जातीय बंधनातून मुक्तता करूया. आणि सर्व समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करूया.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
१५ एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने कोरोनाशी लढा सुरु होणार आहे : नरेंद्र मोदी
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश