VIDEO- अखेर औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

कचरा प्रश्नाविरोधात विरोधकांनी विधानसभेत पुकारलेले आंदोलन 'यशस्वी' झाले.

औरंगाबाद-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची घोषणा केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तत्पूर्वी आज सकाळपासून विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते. औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी महापालिका व पोलीस आयुक्तांना जबाबदार धरत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता.

सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यानंतरराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील प्रत्येक प्रभागात त्या त्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, असा पर्याय यावेळी अजितदादांनी सुचवला. तसेच कचरा प्रश्नावरून झालेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेला लाठीमार ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावे. पोलिसांनी घराच्या काचा फोडल्या.स्वतः पोलिस एकप्रकारे दंगल करत होते. याठिकाणी एकप्रकारे माणुसकीचाच कचरा झाला आहे. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून निवृत्त न्यायधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.

कचरा प्रश्नावरून औरंगाबाद महापालिका हद्दीतील मिट्मिटा गावात पोलिसांनी सामन्य नागरिकांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत औरंगाबाद पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची बदली करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभेत केली होती.

पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही: यशस्वी यादव

पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे याविषयी प्रतिक्रिया देताना औरंगाबादमध्ये अनेक चांगली कामं करायची इच्छा होती. पण सक्तीच्या रजेवर पाठवायच्या सरकारच्या निर्णयामुळे ही कामे आता नवीन अधिकारी पूर्ण करतील व पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही, असे ते म्हणाले. तसेच औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

धक्कादायक : गावकऱ्यांच्या दगडफेकीला पोलिसांकडून देखील दगडफेकीनेच उत्तर

पोलिसांनी गावात प्रवेश करून गावातील घरांवर दगडफेक केली, गल्लीबोळातील वाहनं फोडली, एवढंच काय ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही फोडण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला. रात्रभर दिसेल त्याला पोलिसांनी गुराढोराप्रमाणे 1200 लोकांवर कारवाई केली.

नेमकं काय आहे कचरा प्रश्न 

नारेगाव येथून कचरा डेपो हलवावा ही मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू यावर कोणताही उपाय करण्यात आलेला नाही. खासदार आणि महापौर व इतर पदाधिकां-यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. समांतर पाणी पुरवठा योजना राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासनाकडून करून घेण्याऐवजी खाजगी कंपण्याच्या घशात ही योजना घालण्याचे उद्योग खासदारांनी चालविले आहेत. आयुक्तापासून ते थेट सर्वौच्च न्यायलयाने व इतर सर्व जबाबदार यत्रणांनी ही योजना खाजगी कपंणीना देऊ नये असे सांगितलेले असतानाही खासदार ऐकत नाहीत.

You might also like
Comments
Loading...