कोजागिरी पौर्णिमेला खगोलप्रेमींना ब्लू मूनच्या दर्शनाची पर्वणी

blue moon

नवी दिल्ली : अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा भाविकांसाठी पर्वणी असलेल्या या पौर्णिमेच्या रात्री खगोल प्रेमींसाठी देखील विलक्षण असा ‘ब्लू मून’ चा देखावा बघायला मिळणार आहे. दोन ऑक्‍टोबरला झालेल्या पौर्णिमेच्या दिवशी ब्लड मून दिसला होता.

तर एकाच महिन्यात दोन पौर्णिमा असलेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ब्लू मून दिसणार आहे. तर या आधी 31 जानेवारी, 2018 रोजी ब्लू मून’ दिसला होता. आणि पुढचा ब्लू मून हा सप्टेंबर 2050 मध्ये दिसणार असल्याचं नेहरू प्लॅनेटेरियमचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी या ब्लू मूनचे दर्शन होणार असल्याने खगोलप्रेमींनी ही संधी दवडता कामा नये.

या चंद्र महिन्याचा कालावधी 29.531 दिवस किंवा 29 दिवस, 12 तास, 44 मिनिटे आणि 38 सेकंद आहे. म्हणूनच, एका महिन्यात दोन पूर्ण चंद्रमा आहेत. प्रथम पौर्णिमा महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या दिवशी तर यावर्षी ३० ऑक्टोबरला ‘निळा चंद्र’ असेल. या चंद्र वर्षात १२ ऐवजी १३ पूर्ण चंद्र असणार आहेत. सौर वर्षामध्ये 365.2422 दिवस किंवा 365 दिवस, 5 तास, 19 मिनिटे आणि 30 सेकंद असतात.

म्हणूनच, सौर वर्षात 12.3681 चंद्र महिने आहेत. सामान्य सौर वर्षामध्ये १२.२ चंद्र पूर्ण महिना असतात, ज्यामध्ये अतिरिक्त 0.3681 महिने किंवा 10 दिवस, 20.9 तास असतात. हा अतिरिक्त वेळ जमा होतो आणि सुमारे 30 महिन्यांनंतर वर्षामध्ये एक अतिरिक्त पौर्णिमा असते. त्यामुळे इंग्रजी कॅलेंडर पेक्षा मराठी पंचांगाचा या भौगोलिक स्थिती अशी अत्यंत जवळचा संबंध असतो.

महत्वाच्या बातम्या