शिर्डी-पाथरी वादाच्या मुद्द्यावर विखेंनी दिला कायदेशीर लढाईचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा – शिर्डीच्या साईं बाबांच्या जन्मस्थळाचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रविवारपासून शिर्डी बंदचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे. तसेच खासदार सुजय विखे यांनी शिर्डीकरांची कायदेशीर लढाई लढण्याचीही तयारी आहे असा सरकारला इशारा दिला आहे. याबाबतचे वृत्त रिपबलिक भारत या वृत्त वाहिनेने दिले आहे.

दरम्यान बंद काळात साई मंदिर मात्र दर्शनासाठी सुरू राहणार आहे. रविवारपासून शिर्डी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे परंतु  असं असले तरी खान्यापिण्याचे आणि राहण्यासह अन्य सुविधा मात्र भाविकांना मिळणार नाहीत.

Loading...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरीला साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत त्याच्या विकासासाठी  १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या वादाला सुरवात झाली आहे.

पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र, साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख करण्याला विरोध असल्याचे शिर्डीकर  ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच मुख्यमंत्री यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शिर्डीकरांनी घेतली आहे.

अनिश्चित काळासाठी बंद काळात शिर्डीत एकही दुकान किंवा हॉटेल उघडले जाणार नसल्याचे शिर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याअगोदर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शिर्डी शहर आणि ग्रामीण भागातील लोकांनाही या बंदमध्ये समावेश करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दोन दिवस आधीच बंदचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवला जात आहे. पाथरी गावाला निधी द्यायला आमचा काहीही विरोध नाही. मात्र, साईंचा जन्मस्थळ म्हणून पाथरीला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

तर दुसरीकडे  पाथरीच्या ग्रामस्थांचा दावा आहे कि अवतारी पुरूष साईबाबा यांचे कर्मस्थान शिर्डी हे जगप्रसिद्ध आहे. परंतु दुसरीकडे साईबाबांचे मूळ जन्मस्थान एक गुढ होते. साईबाबांचे परम भक्त विश्वास बाळासाहेब खेर(मुबंई)यांनी २५ वर्षे संशोधन करुन सातत्याने परिस्थितीजन्य पुराव्यांचा पाठपुरावा करून पाथरी, जिल्हा परभणी हे साईबाबांचे जन्मस्थान आहे हे सिद्ध केलं आहे. त्यामुळे सरकारने  पाथरीच्या विकासासाठी प्रयत्न करावे अशी पाथरीकरांची मागणी आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण