मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या सहाव्या दिवशी एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आज या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेना मेळाव्यात बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
“अडीच वर्षात ज्यांनी हिंदूत्वाचा ‘ह’ काढला नाही आज ते हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अनेक आमदारांची नावेही घेतली. जे काल परवा आमच्या सोबत होती, त्यांनी धोका दिला. गद्दारी केली. मात्र त्यांनी माझ्यासमोर यावे आणि मग बोलावे.”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले कि, संदीपान भुमरे, संजय शिरसाट प्रदीप जैस्वाल यांना मोठा फंड देण्यात आला. तो कुणाला विकत घ्यायला किंवा द्यायला नाही, तर विकास कामांसाठी दिला असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले. दरम्यान यावेळी आदित्य ठाकरेंनी एक मोठा खुलासा केला आहे. “२० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी बंड केला. ऑफर दिली असता एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली.” असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- Ranji Trophy 2022 Final : बलाढ्य मुंबईला मध्य प्रदेशचा दणका; पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी!
- Aditya Thackeray : निवडणूक लढवा, पडल्याशिवाय राहणार नाही; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा
- Esha Gupta : ईशा गुप्ताचा बिकिनीवरील व्हिडीओ पाहून चाहते घायाळ! पाहा VIDEO
- Abdul Sattar : “आमची भिकाऱ्यासारखी परिस्थिती झाली होती” ; अब्दुल सत्तारांची खदखद
- Aditya Thackeray Revelation : “20 मे रोजी शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, तरीही…” ; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<