प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शेतकऱ्यांच्या हिताची ग्वाही !

राष्ट्रपतीं

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी कोरोना पासून सिमाप्रश्नापर्यंत सर्वच मुद्यांना हात घातला. कोरोना काळाबद्दल बोलतांना त्यांनी देशातील जनतेने बंधुत्वाच्या घटनात्मक मूल्यांची जोपासना केली, त्याविना कोविड-१९ शी परिणामकारक लढा देणे शक्य नव्हते. जगभर फैलाव झालेल्या करोनाचा सामना करण्यासाठी भारताने अनेक देशांना सुरुवातीला औषधांचा पुरवठा केला. तर आता कोरोन लस पुरवणारा देखील भारतच असल्याने याचाही कोविंद यांनी अभिमानाने उल्लेख केला.

तर चीन च्या विस्तारवादी धोरणावर बोलताना त्यांनी ‘भारत शांततेसाठी कटिबद्ध असला तरी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशाची सशस्त्र दले सुनियोजित पद्धतीने पुरेशी सुसज्ज आहेत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चीनने लडाखमध्ये गेल्या वर्षी घेतलेल्या विस्तारवादी भूमिकेबद्दल सोमवारी येथे स्पष्ट केले. गेल्या जून महिन्यात पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले, त्यांना आदरांजली वाहताना कोविंद म्हणाले की, सरलेले वर्ष अनेक आघाडय़ांवर प्रतिकूल होते. सीमेवर विस्तारवादी भूमिकेचा सामना करावा लागला, परंतु आपल्या शूर जवानांनी तो हाणून पाडला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २० जवान शहीद झाले.

यामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलना वर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे हित जोपासले जाईल याची ग्वाही दिली. तर शेतकरी कोणत्याही परिस्थितीत देशाच्या हिताचे रक्षण केले जाईल, असे स्पष्ट करतानाच कोविंद यांनी, तीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. सुधारणांच्या मार्गावर सुरुवातीला गैरसमज होतील; परंतु सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधील आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

त्यांनी सांगितले की, देशात आर्थिक सुधारणा वेगाने होत असून जगात भारताने योग्य स्थान मिळविले आहे. गेल्या काही वर्षांत भारताचा जगाच्या अनेक भागांवर प्रभाव पडला आहे. भारताचा संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून प्रवेश झाला आणि त्यासाठी भारताला ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळाला ते भारताचा प्रभाव वाढत चालला असल्याचे द्योतक आहे. भारताने एक जबाबदार आणि विश्वासार्ह देश म्हणून लौकिक मिळविला आहे. शेतकऱ्यांनी देशाला अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविले. मेहनती शेतकऱ्यांनी देशाच्या अन्नसुरक्षेची काळजी घेतली त्याचप्रमाणे सशस्त्र दलांच्या आपल्या शूर जवानांनी देशाच्या सीमांचे प्रतिकूल स्थितीत रक्षण केले आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

महत्वाच्या बातम्या