शिवसेनेच्या निर्णयासंदर्भात काकडेंनी अमित शहांसमोर मांडले आकडे

sanjay kakade meeting with shaha

पुणे: शिवसेनेच्या निर्णयासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर चर्चा केल्यामुळे राजकींय चर्चेला उधान आलं आहे. शिवसेने आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर काकडेंनी टीका केली होती.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्याने शिवसेनेचं नुकसानच होईल. लोकसभेला शिवसेनेचे केवळ ५ तर भाजपचे २८ खासदार निवडून येतील, असा अंदाज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवला होता.

blank

आगामी लोकसभा आणि विधानसभेत कोणाला किती जागा मिळतील याचा अहवाल संजय काकडे यांनी तयार केला आहे. शिवसेनेबरोबर युती झाली नाही तरीही भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४८ पैकी भाजपचे ३० खासदार निवडून येतील, असा अंदाज या अहवालात वर्तविण्यात आला आहे. शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अहवालासंदर्भात चर्चा करण्यासाठी काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मुंबईत भेट घेतली. त्यावेळी हा अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निदर्शनास आणावा, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यानुसार संजय काकडे आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली.