ज्या दिवशी आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल: रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा- ज्या दिवशी आरक्षण बदलेल  त्या दिवशी सरकार देखील बदलेल असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आज भंडाऱ्यातून एका संमेलनात ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना इंदू मिलच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद मोदी आले होते तेव्हा त्यांनी आपल्या आरक्षणाल कोणताही धक्का लागणार नाही याची ग्वाही दिली होती .

त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचे काही कारण नाही त्याचबरोबर या विषयांवरून सुरु असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं देखील त्यांनी यावेळी नमूद केले.‘आज आले आमचे भरून मन’, ‘भंडाऱ्यात होत आहे आंबेडकरी संमेलन’ असे म्हणत त्यांनी नेहमीच्या कवी स्टाईलने भाषणाला सुरुवात केली. या संमेलनात पक्षभेद विसरून सर्वजण एकत्र आल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. मी आंबेडकरी कार्यकर्ता असून एका कार्यकर्त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतल्याने आयोजकांचे त्यांनी आभार मानले. गावागावांत जाऊन प्रचार करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला

You might also like
Comments
Loading...