मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आहेत. या पार्शवभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर सर्वसाधारण व्यक्तीच नाही तर सेलिब्रेटीसुद्धा प्रतिक्रिया देत आहेत. आता यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता ‘रानबाजार’ वेबसीरिजमधील एका सीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. सध्या याची सगळीकडे चर्चा चालू आहे.
तेजस्विनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मकरंद अनासपुरे यांचे डायलॉग होते. ते डायलॉग म्हणजे, “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही.” महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं की, “मला तरी असं वाटतं रानबाजार आणि सध्या सुरु असलेल्या राजकारणामध्ये फारसं अंतर नाही.”
महत्वाच्या बातम्या :