उलट सुलट चर्चांमुळे पंकजा मुंडे दुखावल्या, तावडेंनी दिली माहिती

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपातून शिवसेनेत जाणार असल्याचही बोलल जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपाकडून धावपळ सुरू असल्याचेच चित्र आहे. सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर्व व्यवस्थित असल्याचं सांगितलं होत. पण, २४ तासातच भाजपाचे नेते विनोद तावडे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

या भेटीनंतर विनोद तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी केलेली पोस्ट ही केवळ गोपीनाथ गडावर येण्याचे आमंत्रण होते. मात्र यावर उलट सुलट चर्चा झाल्यामुळे पंकजा मुंडे ह्या आता दुखावल्या आहेत. १२ डिसेंबर हा दिवस भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्म दिवस असल्याने सर्व मुंडे समर्थक, कार्यकर्ते आणि भाजप नेते एकत्र येत असतात. त्याचप्रमाणे या वर्षीही ही परंपरा कायम राहणार आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी पोस्ट टाकत सर्वांना आमंत्रण दिले होते. मात्र या पोस्टवरून निरर्थक आणि उलटसुलट चर्चा झाल्या.

दरम्यान भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असण्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा मुंडे या भाजपचा नवा गट तयार करण्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत. गोपीनाथ गडावर येत्या 12 तारखेला जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असल्याचंही बोललं जातंय.तसेच महाराष्ट्रात अडगळीत पडलेला मुंडे गट पुन्हा सक्रीय होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

महत्वाच्या बातम्या

Loading...