नवी दिल्ली: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असतानाच आता अनेक राज्यांनी मिनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. मात्र महाराष्ट्रात तर अजून लॉकडाऊनबाबत कोणताही विचार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र निर्बंध कडक करण्यात आले आहेत. असे असतानाच आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
आज दुपारी ३: ३० वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात,मध्यप्रदेश, गोवा, दादर नगर हवेली, दमन आणि दिव या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे आरोग्यमंत्री तथा आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीत मनसुख मांडवीय कोरोना संबंधी माहिती तथा यासंबंधी तयारीबाबत चर्चा करणार आहेत. याबाबत मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारनेही काही निर्णय घेतले आहे. राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून रात्री ११ ते सकाळी ५ हा नाईट कर्फ्यू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. काळ ९ जानेवारी मध्यरात्रीपासून हे नियम लागू झाले आहेत. तसेच यामध्ये केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, परंतु ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर आता सुधारीत आदेश काढत काही निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या बातम्या खोट्या असून शिवसेनेत फक्त…’, आदित्य ठाकरेंनी दिला ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम
- गोवा भाजप पर्रीकरांचा वारसा पुढे नेताना दिसत नाही म्हणत ‘या’ मंत्र्याने ठोकला भाजपला रामराम
- यंदाचा IPL सीजन महाराष्ट्रात घेण्यासाठी शरद पवार आग्रही, …BCCI चा B प्लानही तयार
- मोदींच्या ‘सुरक्षेतील त्रुटी’ला जबाबदार कोण? हायकोर्टात आज होणार सुनावणी
- “…ब्युटी पार्लर सुरु करण्याबाबत जादूची कांडी फिरली आणि ठाकरे सरकारने यू टर्न घेतला”