मुंबई: आज १९ जूनरोजी शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील पवईत वेस्टीनमध्ये असल्याने शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होत आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधला. अनेक मुद्द्यांवर हाथ ठेवत उद्धव ठाकरेंनी विरोधकांनाही चांगलेच सुनावले आहे.
“आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली असल्याचा इतिहास आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको.”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
तसेच मला येणाऱ्या निवडणुकीची चिंता नाही. मी चिंता केली तर तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? विजय-पराभव होतच असते. उद्या तर जिंकणारच त्याची चिंता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोणतं? त्याचा अंदाज लागलाय त्याचाही उलगडा होईल. शिवसेनेत असा गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मग अग्निविरांच्या पंचायती तुला कशाला?; अतुल भातखळकरांचा कन्हैय्या कुमारला सवाल
- “मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर, बॅग भरून पैसे दिले” ; तरूणीचा खुलासा!
- IND vs SA : श्रेयस अय्यरच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खराब कामगिरीवर माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला…!
- “शिवसेना एक वादळ आहे, आग आहे आणि…” ; संजय राऊतांचा शिवसेनेतला अनुभव
- आमदार संपर्कात असल्याचा भ्रम भाजप पसरवत आहे – संजय राऊत