fbpx

प्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या तयारीत

Vinod_Tawde

टीम महाराष्ट्र देशा/ प्रदीप मुरमे  : सन २०१६ मध्ये सरसकट २० टक्के अनुदान प्राप्त १६२८ शाळा व २४५२ वर्गतुकड्यांना २६ जानेवारी पर्यंत प्रचलित नियमानुसार १०० टक्के वेतन अनुदान न मिळाल्यास राज्यातील ५०० आंदोलक शिक्षक प्रजासत्ताक दिनी मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या पविञ्यात असल्याचा इशारा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.पी.पाटील यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिला.

मागील तब्बल १७-१८ वर्षापासून शिक्षणासारख्या पविञ क्षेञात ‘विनावेतन’ विद्यादानाचे काम करणा-या या शिक्षकांना विविध आंदोलने व मोठा संघर्ष उभा केल्यानंतर अखेर सन २०१६ मध्ये १०० टक्के अनुदान देण्याऐवजी तुटपूंजे सरसकट २० टक्के अनुदान देवून या शिक्षकांची शिक्षणमंञ्यांकडून बोळवण करण्यात आली.दरम्यान या अनुदानामध्ये मागील ३ वर्षापासून कसलीही वाढ करण्यात आली नाही !

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटनेने प्रचलित नियमानुसार या शाळा व वर्गतुकड्यांना १०० टक्के अनुदान मंजूर करावे या मागणीसाठी आझाद मैदानावर मागील ११० दिवसापासून आंदोलन छेडत आहे .राज्य मंञीमंडळातील ८ मंञी,८० आमदार व ३ खासदारांनी शिक्षकांच्या या न्याय मागणीबाबत सहानभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी पञाव्दारे ना.विनोद तावडे यांना केली आहे.परंतु ना.तावडे यांनी याबाबत अद्याप काहीही कार्यवाही केली नाही !ठिय्या आंदोलनाचा आज १११ वा दिवस असून सरकारच्या या उदासीन धोरणामुळे या शिक्षकांची मानसिकता दिवसेंदिवस ढासाळत चालली आहे.

२६ जानेवारी पर्यंत शासनाने आमची १०० टक्के अनुदानाची मागणी मंजूर करावी याबाबत आपण संघटनेच्यावतीने २१ जानेवारी रोजी एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री,अर्थमंञी व शिक्षणमंञी यांना परत शेवटचे साकडे घालणार असल्याचे के.पी.पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.सरकारने आमच्या या मागणीची गंभीर दखल न घेतल्यास मागील अनेक दिवसापासून चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाने अगोदरच हताश झालेल्या आमच्या आंदोलक शिक्षकाला २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही.यामध्ये २५० महिला शिक्षिका राहणार आहेत.त्यामुळे आम्ही हा टोकाचा निर्णय घेतला असून याला सर्वस्वी शासन व शिक्षक आमदार जबाबदार राहतील असे स्वाभिमानी संघटनेचे के.पी.पाटील यांनी सांगितले.याप्रकरणी सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

1 Comment

Click here to post a comment