fbpx

व्हिडीओ: आपल्याला माहित नसलेल्या गोष्टीत तोंड घालू नका; नाना पाटेकरांवर राज ठाकरेंचा निशाणा

मुंबई: आपल्याला माहित नसलेल्या गोष्टीत तोंड घालू नका, मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती तेव्हा नाना कुठं गेले होते म्हणत राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. तुम्ही मराठी कलावंत मात्र आम्ही अभिनंदन करायचं तर निरूपण तुमचं अभिनंदन करतो. तसेच वेलकम चित्रपटात बटाटे विकत होता म्हणून फेरीवाल्यांचा पुळका आला का असा सावला देखील राज यांनी यावेळी केला आहे.

अनधिकृत फेरीवाल्यां विरोधात मनसेकडून जोरदार आंदोलन केल जात आहे. मात्र मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला तर पुण्यातील कार्यकर्त्यावर दरोडा टाकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबईतील मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागल होत. दरम्यान राज ठाकरे यांनी सरकार वर देखील निशाणा साधला आहे

राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण