सोलापूर : महास्वामी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कापून भाजपने हा नवा चेहरा सोलापूरकरांना दिला आहे. आता काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे विरुद्ध डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यात सामना रंगणार आहे.

Loading...

दरम्यान सोमवारी दुपारी महास्वामींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. मुळात जयसिद्धेश्वर यांचा राजकारणाशी काडीमात्रही संबंध नसून ते अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख आहेत. आयुष्यभर अंगावर भगवी वस्त्रे नेसून या स्वामींनी संत साहित्य अन् धर्म प्रवचन हेच कार्य अंगिकारले होते. त्यांनी धर्मशास्त्रात पीएचडी केली असून कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यासह अनेक भाषा त्यांना अवगत आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2014 साली भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात होता; त्यावेळीही यांच्या नावाची कुजबूज सुरू झाली होती. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे जातीची वैध प्रमाणपत्रे सविस्तर नसल्याने त्यांचे नाव मागे पडले. अन् त्यांनीही त्यावेळी राजकारणात उतरण्याबाबतची ठाम भूमिका घेतली नव्हती.मात्र गेल्या दोन महिन्यांपासून जयसिद्धेश्वर यांचे नाव जोरात चर्चिले जात होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जयसिद्धेश्वर यांच्यासाठी जोर लावला होता. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशीही चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी जयसिद्धेश्वर यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले.

दरम्यान डॉ. महास्वामी यांनाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे . यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख , सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.Loading…


Loading…

Loading...