भंडारींनी फुकटचे सल्ले देऊ नये- खा. नाना पटोले

Nana-Patole

नागपूर:  भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी दोन दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार नाना पटोले यांनी पक्षाच्या व्यासपीठावर आपले मत मांडायला हवे असे सांगितले होते. त्यांच्या या विधानाचाखा. पटोले यांनी आज, गुरुवारी नागपुरात जोरदार समाचार घेतला. भंडारींनी माझ्या भानगडीत पडू नये आणि फुकटचे सल्ले देऊ नये असा टोला खा. पटोले यांनी यावेळी लगावला.

Loading...

याप्रसंगी खा. पटोले म्हणाले की, यापूर्वी आपण पक्षाच्या व्यासपीठावर आणि नेत्यांकडे वेळोवेळी शेतक-यांचे प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे माझी भूमिका पक्षविरोधी असल्याचे कुणी म्हणू शकत नाही. जनतेसाठी भांडणे हा आपला स्वभावअसून कुणीही यात पडण्याचे कारण नाही. जर कुणी आपल्या वाटेला गेले तर त्याला शिंगावर घेतले जाईल असा इशारा खा. पटोले यांनी यावेळी दिला.

स्वत:चा पक्ष आणि नेत्यांवर गेल्या काही महिन्यांपासून टीका करणा-या पटोलेंना आता भाजपकडूनही प्रत्युत्तर मिळू लागले आहे. नागपुरातील पत्रकार परिषदेत प्रवक्ते माधव भंडारी यांनी खा. पटोले आदत से मजबूर असल्याची टीका केली होती. तसेच त्यांनी आपले मुद्दे पक्षाच्या व्यासपीठावर मांडण्याचा सल्लाहीदिला होता. भंडारी यांचे विधान आणि सल्ला नानांच्या खुपच जिव्हारी लागला. त्यामुळे आज, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भंडारी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

विधान परिषदेचे सदस्यत्व न मिळाल्यामुळे मधल्या काळात भंडारी बेपत्ता झाले होते. त्यांची स्वत:ची अवस्था बिकट असून त्यांनी मला नाहक सल्ले देऊ नये असा चिमटा खा.पटोले यांनी काढला. आपल्याला शिवसेना आणि काँग्रेसकडून पक्ष प्रवेशाची ऑफर आहेत. परंतु, येत्या फेब्रुवारी महिन्यानंतर आपण आपली राजकीय दिशा स्पष्ट करणार असून तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या काळात राहुल गांधी यांची भेट घेऊन शेतकरी धोरणांवर चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आणि नाना पटोले हे येत्या 1 डिसेंबर रोजी विदर्भातील अकोला येथे आयोजित कापूस-धान परिषदेच्या निमित्ताने एका व्यासपीठावरयेणार आहेत. विशेष म्हणजे खा. पटोले यांनी यापूर्वी यशवंत सिन्हा यांची नागपूर विमानतळावर भेट घेतली होती.Loading…


Loading…

Loading...