दहा जानेवारीला ‘महाराष्ट्र बंद’ हि अफवा ; मराठा क्रांती मोर्चा

मराठा दलित वाद लावू पाहणा-यांच्या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये

मुंबई : मराठा समाजाच्या वतीने १० जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशी पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चातर्फे कुठलाही बंद नाही असं स्पष्ट करण्यात आलं.

मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू असं आवाहनी करण्यात आलं आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही. आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही असं समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी स्पष्ट केल आहे.

काय म्हणाले लक्ष्मण पोखरकर ?

१ जानेवारीला आपल्या भावाला जीव गमवावा लागला. तर २ जानेवारीला प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचं नुकसान केलं गेलं आहे. काही ठकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. याच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून ‘महाराष्ट्र बंद’ बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही. मराठा समाजातील तरूणांचा वापर करून राजकारण करून मराठा दलित वाद लावू पाहणा-यांच्या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये. तसेच मराठा समाजाला उतरवून मराठ्यांनाच टार्गेट करून जातीय तेढ निर्माण करून मराठ्यांची चळवळ मोडीत काढून मराठ्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न हानून पाडावा. हिंसाचारापेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेच आहे.

You might also like
Comments
Loading...