fbpx

शुक्रवारी मोदी नगरमध्ये, जोरदार शक्तीप्रदर्शन करत राधाकृष्ण विखे करणार भाजप प्रवेश ?

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदनगरमध्ये असणार आहेत. सुजय विखेंची लढत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संग्राम जगताप यांच्याशी होणार आहे.

कॉंग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांचे वडील राधाकृष्ण विखे हे कॉंग्रेसमध्येच आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या मोदींच्या सभेत ते जोरदार शक्तीप्रदर्शनासह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखेंनी १५ दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे विखेंच्या भाजपप्रवेशाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे हे मुलाप्रमाणेच भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

दरम्यान,जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी नगर दौरा केला होता. आणि आता प्रत्यक्ष मोदी सुजय विखेंचा प्रचार करणार आहेत त्यामुळे ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे.