माधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”

टीम महाराष्ट्र देशा – बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या अभिनेता माधव देवचकेची त्याच्या चाहत्यांमध्ये इमेज ‘समंजस’ बिग बॉस कन्टेस्टंट अशी आहे. आणि त्याच्या वडिलांनीही फादर्स डे निमित्ताने त्याची पाठ थोपटलीय.

“फादर्स डे’ निमित्ताने संवाद साधताना माधवचे वडिल चारूदत्त देवचके म्हणाले, “लहानपणापासूनच माधवमध्ये समंजसपणा आम्हांला दिसून आलाय. ब-याचदा मुलांची ओळख त्यांच्या वडिलांमूळे असते. पण माझी ओळख माधवच्या लहानपणापासूनच ‘माधवचे वडिल’ अशी होती.”

Loading...

“मी नाट्यनिर्माता असल्यामूळे माझ्या ओळखीचा फायदा माधवला करीयरमध्ये कधी ना कधी व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण माधवने कुठेही माझी ओळख न वापरता स्वत:च्या ताकदीवर आपलं करीयर घडवलं, याचा मला अभिमान आहे. अभिनेत्याच्या करीयरमध्ये ब-याचदा आर्थिक उतार-चढाव होत असतात, पण अशावेळेसही मी देऊ केलेली मदत स्वावलंबी माधवने स्विकारली नाही.”

‘बिग बॉस’ मधल्या माधवच्या वाटचाली विषयी त्याचे वडिल सांगतात, “बिग बॉसमध्ये माधव खूप चांगलं खेळतोय. कुठेही पातळी न घसरू देता, आणि आपले संस्कार न विसरता तो खेळतोय, याचा मला अभिमान आहे. राग व्यक्त करतानाही तो खूप संयतपणे व्यक्त करतोय. बिग बॉस जिंकून येण्यासाठी माधवला माझ्या शुभेच्छा.”

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी