कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव आघाडीवर , मात्र शिंदे म्हणतात…

SHINDE

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर कॉंग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला तारण्यासाठी नवीन कॉंग्रेस अध्यक्षाची चाचपणी कॉंग्रेसच्या कार्यकारणी समितीकडून होत आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक ज्येष्ठ आणि उमद्या नेत्यांची नवे चर्चेत आहेत, मात्र त्यातल्या त्यात सुशीलकुमार शिंदे यांचे नाव हे आघाडीवर आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झालं असल्याची चर्चा आहे. मात्र यावर भाष्य करणे सुशीलकुमार शिंदे टाळत आहेत. शिंदेंना कॉंग्रेस अध्यक्ष पदाबाबत विचारले असता त्यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात का, असे विचारल्यावर त्यांनी काहीही बोलायचे नसल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्याप पक्षाने नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केलेली नाही. नवा अध्यक्ष गांधी कुटुंबातील नसेल, एवढेच स्पष्ट करण्यात आलेले असले, तरी तो नक्की कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक नाव चर्चेत असून सुशीलकुमार शिंदे, ज्योतिरादित्य सिंधिया, मल्लिकार्जुन खर्गे, सचिन पायलट ही नाव अग्रस्थानी आहेत.